शहर

मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर – ११ नोव्हेंबरला काढली जाणार सोडत

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील विविध आरक्षित संवर्गांसाठी आरक्षण सोडत काढण्याचा आणि त्यावरील हरकती व सुचना मागविण्याचा कार्यक्रम** आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी जाहीर केला आहे.

सन २०२५ मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरीकांचा मागास प्रवर्ग, मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी प्रभागनिहाय आरक्षण ठरविण्यात येणार आहे.

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरक्षण सोडत: मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५, सकाळी ११ वाजता,
ठिकाण: डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड.
आरक्षणाचे प्रारूप प्रकाशन: सोमवार, दि. १७ नोव्हेंबर २०२५
हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी: सोमवार, १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत.

संबंधित हरकती आणि सुचना निवडणूक विभाग, स्टेडियम परिसर, नांदेड येथे सादर कराव्यात. प्राप्त हरकती व सुचनांचा सखोल विचार करून त्यानंतर अंतिम आरक्षण अधिसूचना जारी करण्यात येईल, असे आयुक्त डोईफोडे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे मनपा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून स्थानिक राजकीय वर्तुळात आरक्षणाच्या संभाव्य बदलांबाबत चर्चांना उधाण आले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *