शिक्षण

विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे पहिल्याच दिवशी बारा वाजले- प्रयोगशाळा गायब, प्राध्यापक बेपत्ता—विद्यार्थ्यांची घोर पंचाईत!

 

नांदेड, दि. ११ डिसेंबर — स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक १० डिसेंबर २०२५ पासून सुरू झाल्या. या परीक्षेसाठी विद्यापीठाने बहिस्थ परीक्षकाची नेमणूक केली आहे. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या असताना पहिल्याच दिवशी मोठी अनियमितता व शिक्षणाची गंभीर स्थिती उघडकीस आल्याची माहिती मिळाली आहे. विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयात प्रात्यक्षिक परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या बहिस्थ परीक्षकांनी आपल्या अहवाल विद्यापीठाला त्याच दिवशी पाठवला.

शंभरपेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचे नमूद केले आहे. अनेक महाविद्यालयांत, प्रयोगशाळा, प्रयोगशाळा साहित्य, उपकरणे यांचा अभाव असून काही ठिकाणी विद्यार्थीच परीक्षेला गैरहजर राहिल्याचे दिसून आले. तर काही महाविद्यालयांत संबंधित विषयाचे प्राध्यापक नाहीत.
महाविद्यालयात प्रयोगशाळा गायब, प्राध्यापक बेपत्ता तर विद्यार्थी गैरहजर, तर काही महाविद्यालयांमध्ये आधीच प्रात्यक्षिक लिहून घेतले आहेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या स्थितीमुळे मोठ्या संख्येने प्रात्यक्षिक परीक्षा घेता न आल्याचे परीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळाच नाहीत प्राध्यापकच नियुक्त केले नाहीत तर विद्यार्थ्यांना शिकवलं काय असेल हा मोठा संशोधनाचा विषय आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाते. विद्यापीठाने यापूर्वी सलग्निता देताना व त्यानंतर शैक्षणिक ऑडिट करताना काय पाहिले असेल की फक्त कमिटीने पैसे घेऊन मान्यता दिली असेल?

या सर्व घडामोडींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचा या विद्यापीठ व महाविद्यालयाच्या लापरवाहीमध्ये कोणताही दोष नसताना त्यांच्या परीक्षाच पार पडू न शकल्याने असंतोष व्यक्त होत आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित महाविद्यालयांवर तातडीने कारवाई करावी व विद्यार्थ्यांना पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना SFI ने विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

SFI ने आपल्या निवेदनात विद्यापीठाच्या शैक्षणिक विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या निष्काळजीपणाला गांभीर्याने घेत त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे. प्रात्यक्षिक परीक्षा विस्कळीत झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात असून पुढील परीक्षांचे नियोजन सुरळीत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *