शासकीय रोजगार उद्योजकता उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा- सहाय्यक आयुक्त तमलवार

नांदेड दि.२३ महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शासनाद्वारे चालवण्यात येणाऱ्या विशेष रोजगार व उद्योजकता उपक्रम प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आयुष्यामध्ये यशस्वी व्हावे असे प्रतिपादन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य पालघरच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तमलवार यांनी केले त्या कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटक म्हणून कार्यक्रमात बोलत होत्या.

सुरुवातीला तिलावते कुराण मिद्दत बेगमने केली तर हम्द अयशा समरीन हिने सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून बानो एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव प्रा.अर्जुमंदबानो यास्मिन या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा.डी.बी. जांभरुणकर हे होते.यावेळी विचारपिठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उस्मान गणी हेही उपस्थित होते.
पुढे श्रीमती तम्मलवार म्हणाल्या की विद्यार्थी जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी अनेक भाषांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले पाहिजे त्याचबरोबर कोणते तरी एक विशेष व्यावसायिक कौशल्यात पारंगत झाले पाहिजे जेणेकरून त्या कौशल्याचा वापर करून रोजगार मिळवणे सहज शक्य होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उस्मान गणि यांनी केले तर अध्यक्षीय समारोप प्रा.अर्जुन यास्मिन यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता कोंडेवार यांनी केले तर आभार डॉ.बाबासाहेब भुकतरे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. मोहम्मद इस्माईल,प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.सय्यद फराज,प्रा.निजाम इनामदार,प्रा.मोहम्मद रिजवान बागवान,प्रा. सनोबर मॅडम,प्रा.शबनम मॅडम प्रा.समिना खान, मोहम्मद अनवार,मोहम्मद फराज,आदित्य पाटील भोंग, मोहम्मद दानिश यांची उपस्थिती होती.



