लोह्यात अल्ताफ मोहम्मद लदाफ यांचा सत्कार

लोहा, प्रतिनिधी : लोहा येथील रहिवासी अल्ताफ मोहम्मद लदाफ यांची Mumbai Police अंतर्गत कारागृह पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या यशामुळे लोहा शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अल्ताफ लदाफ यांनी मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून त्यांच्या या निवडीबद्दल मित्रपरिवार व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन व शाल श्रीफळ देत सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी वृत्तपत्र छायाचित्रकार तथा पत्रकार विनोद महाबळे, शैलेंद्र राजभोज, लक्ष्मण महाबळे, सलीम लदाफ, अमन लदाफ व सर्व मित्रपरिवार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अल्ताफ लदाफ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रतिक महाबळे यांनी केले.



