फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद आज अभिवादन व विविध कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड, 13- जिल्हा परिषद नांदेड येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून महामानवांना अभिवादन केले. या रक्तदान शिबिरात एकूण 38 जणांनी रक्तदान केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, नरेगा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष रणजीत गजभारे, सचिव राजेश जोंधळे, कार्याध्यक्ष धनंजय गुम्मलवार, कोषाध्यक्ष विजय वाघमारे, पवन तलवारे आदी उपस्थित होते.
या शिबिरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ. प्रांजला नरवाडे, डॉ. ऐश्वर्या गोखले, कुणाल महागडे, विजय नागरगोजे, बी. भालेराव, दीपक वानखेडे, यश चौधरी, सय्यद आझम, सय्यद बशीर आदींनी मोलाचे सहकार्य केले.
आज अभिवादन व विविध कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा परिषद परिसरातून बँड वाजत-गाजत मिरवणूक काढून अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, दत्तात्रय गिरी, प्रशांत थोरात, मयूरकुमार आंदेलवाड, अमित राठोड, कार्यकारी अभियंता राहूल रावसाहेब, संजय शिंदे, राहुल भोजराज, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माधव सलगर, दिलीपकुमार बनसोडे, कृषी अधिकारी नीलकुमार ऐततवडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच सकाळी 10.30 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते जिल्हा परिषद परिसरात अन्नदान व पाणी वाटप कार्यक्रम होणार असून, सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष रणजीत गजभारे, सचिव राजेश जोंधळे, कार्याध्यक्ष धनंजय गुम्मलवार, कोषाध्यक्ष विजय वाघमारे, सहसचिव राघवेंद्र मदनुरकर, बालाजी नागमवाड, अशोक मोकले, प्रसिद्धीप्रमुख मिलिंद व्यवहारे, जितेंद्र तोटलवार, उज्वला गजभारे, स्वाती जोंधळे, कीर्ती मिवळे, बालाजी टोके, सुनील कदम, दीपक महालिंगे, नंदलाल लोकडे, गणेश आंबेकर आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



