महाराष्ट्रा
हजूर साहिब नांदेड येथून सुटणारी हजूर साहिब नांदेड – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वे गाडी उशिरा सुटणार

गाडी क्रमांक ०७६२१ हजूर साहिब नांदेड – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८:४५ वाजता सुटणार होती. मात्र ही गाडी ३६० मिनिटे उशिराने म्हणजेच दुपारी १४:४५ वाजता सुटेल.
ही गाडी लिंक ट्रेन क्रमांक ०७७०२ एक्सप्रेस ४८४ मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे उशिरा सुटणार आहे.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.



