हेल्थ

नांदेड हिवताप कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष कल्याणकर

नांदेड :- महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड यांची आज दि.१ डिसेंबर २०२३ रोजी पतसंस्थेच्या मगनपुरा येथील कार्यालयात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व पंच यांची निवड प्रक्रिया प्राधिकृत अधिकारी अनिल घोगरे यांच्या मार्फत राबविण्यात आली. विकास सहकारी पॅनल प्रमुख सुभाष कल्याणकर यांची दुसर्‍यांदा चेअरमन पदी निवड, सचिव पदी सुरेश आरगुलवार, उपाध्यक्ष पदी देविदास पेंढारकर व पंच पदी माणिक गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित संचालक पप्पू देसाई नाईक, अशोक ढवळे, मोहन पेंढारे, विठ्ठल मोरे यांनी निवड प्रक्रियेत भाग घेतला.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या निवड बदल शुभेच्छा देताना चंद्रभान धोंडगे,सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पूलकंठवार, बालाजी आळणे,व्यंकटी बकाल, गणेश ताडेवाड, वनराज कदम, उत्तम कराड, माधव ईटकापल्ले, सुरेश पिंपळगावकर,शंकर चव्हाण, महेश सातारे, किरण कुलकर्णी सभासद व कर्मचारी पतसंस्थेचे लिपिक कैलास मोरे, श्रीमती मंगलबाई वानखेडे उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *