हेल्थ

जागतिक एड्स दिनानिमित्त भोकर शहरात रॅली काढून केली जनजागृती

 

भोकर :- आज दि. १ डिसेंबर रोजी ” जागतिक एड्स दिन ” निमित्त भोकर शहरात ग्रामीण रुग्णालय आणि राम रतन नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ वाजता च्या दरम्यान भोकर शहरात भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय आणि शिवाजी चौक इथपर्यंत जाऊन ही रॅली पुन्हा त्याच मार्गाने परत येऊन नर्सिंग कॉलेजमध्ये विसर्जित झाली.

यावेळी शाळेतील असंख्य विद्यार्थी आणि ग्रामीण रुग्णालयाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते यात वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनंत चव्हाण, आयसीटीसी विभाग प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रिनंदन पांचाळ,मनोज पांचाळ, आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, सुरेश डुमलवाड, नामदेव कंधारे, जाहेद अली, सैफ अली, मारोती कठारे, वाहन चालक फणसवाड, राम रतन नर्सिंग कॉलेजचे मंगेश सर व विद्यार्थ्यीनी यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *