शिक्षण

प्रा.दीपक भालेराव यांना पीएचडी पदवी प्रदान

 

नांदेड दि.4 संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कलंबर येथील प्रा. दीपक मधुकर भालेराव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड द्वारे विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी प्रा.डॉ.जे.टी.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र या विषयात “ई.व्ही.रामास्वामी नायकर यांचे कार्य आणि कर्तृत्वाचा विश्लेषणात्मक अभ्यास” या शीर्षकाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण केले.
मौखिक परीक्षेसाठी पंच म्हणून डॉ.नवनाथ आघाव, एस.बी. कॉलेज,छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते.

 

त्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे समाज उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मारोतीराव पाटील घोरबांड,मुख्याध्यापक श्री. मामडे एस.एन., प्रा.डॉ.विजय पवार, प्रा.डॉ.बाबासाहेब भुक्‍तरे, प्रा.शेट्टे जी.के,प्रा.वाघमारे ए.आर,प्रा.विनायक मुंडे, प्रा.भुयारे डी.आर,प्रा.वन्ने सर,स्वामी बी.जी, गायकवाड बी.एम,कदम चक्रधर,पानपट्टे बी.एम,एन.टी.सिरसाट,शिंदे भगवान,प्रा.उत्तम भालेराव,डॉ.मुंडे परमेश्वर,बामणीकर सर, संजीव भालेराव,संजय हंकारे,रत्नदीप सोनकांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *