हेल्थ

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष तपासणी मोहीम ” राज्यस्तरीय मेळावा आणि उद्घाटन सोहळा संपन्न

 

नांदेड :- आज दि.०१/०३/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार, मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य श्री प्रकाश आबिटकर साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे उद्घाटन सोहळा पार पडला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत राज्यातील वय वर्ष 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज राज्यातील सर्व जिल्हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) उद्घाटन सोहळ्यास व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) च्या माध्यमातून सदरील उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.


त्यानुसार आज दि.1 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्हास्तरीय उद्घाटन प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा जंगमवाडी महानगरपालिका नांदेड येथे माननीय आमदार श्री बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राहुल कर्डिले सर जिल्हाधिकारी नांदेड, माननीय डॉ. निळकंठ भोसीकर सर (जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड ), डॉ. संजय पेरके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, डॉ. संतोष सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय नांदेड, श्री अनिल कांबळे आर बी एस के जिल्हा समन्वयक, श्री विठ्ठल तावडे डी आय सी व्यवस्थापक हे उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आर बी एस के पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आली असून तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांची वजन, उंची, घेऊन सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्रदोष, रक्तक्षय चाचणी करण्यात आली किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना औषधोपचार देण्यात आले. तसेच संदर्भ सेवेसाठी पात्र विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. आरोग्य तपासणी दरम्यान मनपा जंगमवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामराव पांडुरंग साबळे सर, मनपा गणेश नगर शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती आल्लमवाड मॅडम, मनपा आंबेडकर नगर मुख्याध्यापिका श्रीमती अशाबाई घूले मॅडम मनपा लेबर कॉलनी येथील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेश्मा बेगम मॅडम व त्यांचे सहशिक्षक यांचे सहकार्य लाभले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *