हेल्थ

नांदेडच्या तुकामाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुडघा फ्रॅक्चरचे यशस्वी ऑपरेशन;

शेख हारून यांना मिळाली नवजीवन डॉ. दत्तात्रय काळे पाटील येहळेगांवकर यांच्या टीमचे कौतुकास्पद कार्य

 

नांदेड – नांदेडमधील तुकामाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नवा मोंढा येथे एका गुडघ्याच्या गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या ऑपरेशनमुळे लातूरचे रहिवासी शेख हारून मोहम्मद हनीफ यांना पुन्हा चालण्याचा आधार मिळाला असून, त्यांनी नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त केली.

शेख हारून यांना काही महिन्यांपूर्वी रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाली होती. लातूरच्या सईद्री हॉस्पिटलमध्ये दोन वेळा ऑपरेशन करण्यात आले, परंतु दोन्ही वेळा अपयश आले. त्यानंतर त्यांनी शिर्डी, हैदराबाद आणि मुंबई येथे उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र समाधानकारक उपचार मिळाले नाहीत.

शेवटी त्यांनी नांदेड येथील टकामाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गाठले. येथे हाड व सांधे तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय काळे पाटील येहळेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. मगदूम बेग यांच्या सहकार्याने अत्यंत यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली.

शेख हारून हे मागील ९ महिन्यांपासून अपंगत्वाचा सामना करत होते. आता ते पूर्णतः चालू लागले असून त्यांचे आरोग्य झपाट्याने सुधारत आहे.

त्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले,
“तुकामाई हॉस्पिटलने माझ्यावर योग्य उपचार केले. येथे मला खरी मदत मिळाली, आणि मी पुन्हा चालू लागलो. डॉक्टर आणि सर्व टीमचे मनापासून आभार!”

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नांदेडमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक वैद्यकीय सेवा आणि अनुभवी डॉक्टर्सवर विश्वास अधिक बळकट झाला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *