एकलव्य विद्यापीठ, दमोह येथील संशोधक लवलेश वसंतराव महाजन यांना पी-एच.डी. पदवीची शिफारस

दमोह (मध्यप्रदेश) : एकलव्य विद्यापीठ, दमोह येथे आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी पी-एच.डी. संशोधन प्रबंधाची मौखिक परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. विद्यापीठातील संशोधक लवलेश वसंतराव महाजन यांनी “श्रेणिक चरित्र प्रसंग की पाण्डुलिपि का सम्पादन एवं समीक्षात्मक अध्ययन” या विषयावर आपले संशोधन कार्य पूर्ण केले आहे. हे संशोधन कार्य त्यांनी जैन आणि प्राकृत अध्ययन विभागातील प्रो. ऋषभ चंद्र जैन (फौजदार) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.

या संशोधनासाठी विद्यापीठाच्या कुलाधिपती डॉ. सुधा मलैया, तसेच श्रीमती पूजा मलैया व श्रीमती रती मलैया (प्रतिकुलाधिपती) यांचे मार्गदर्शन लाभले. पी-एच.डी. मौखिक परीक्षेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. पवन कुमार जैन यांनी भूषविले.
मौखिक परीक्षेसाठी दिल्ली येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे, जैन दर्शन विषयातील ज्येष्ठ प्राध्यापक प्रो. अनेकांत कुमार जैन यांना बाह्य परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी पी-एच.डी.ची मौखिक परीक्षा विधिवत पार पाडली.
या प्रसंगी कला व मानविकी संकायाचे अधिष्ठाता प्रो. आर. सी. जैन, तसेच डॉ. शैलेन्द्र जैन, डॉ. अनिल पिंपलापुरी, डॉ. व्ही. शबनम, डॉ. दुर्गा महोबिया, डॉ. आशीष कुमार जैन (संस्कृत विभागाध्यक्ष), डॉ. आशीष कुमार जैन बम्होरी (जैन व प्राकृत अध्ययन विभाग), डॉ. विवेक गेडाम, डॉ. सूर्यनारायण गौतम, डॉ. भाग्यश्री, डॉ. प्रमिला कुशवाहा, डॉ. वंदना पांडेय, डॉ. मनीषा दीक्षित, डॉ. राहुल वर्मा, डॉ. शिराज खान, डॉ. विजय कुमार साहू, डॉ. संदीप तिवारी, डॉ. वंदना शुक्ला आदी अनेक प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते.



